टिचकीसरशी शब्दकोडे २

टिचकीसरशी शब्दकोडे २

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
नकार मधात घोळवून नंतर युद्धात अनुकूल निर्णयासाठी केलेली आर्जवे. (५)
११ अभाव आणि संग्रह असे असणे कठीणच. (४)
२१ ही गुंतवणुकींची निष्पन्ने आहेत असे वाटले की पाठ फिरवावी. (४)
३१ महाराष्ट्रातून पाठवतात आणि बंगालमध्ये खातात. (३)
३४ मृत्यूची सुरवात टाळणारी संपत्ती. (२)
४१ तिकडचीवर मच्छीमार की पाणवनस्पती? (३)
४४ वेग धोक्याच्या रंगात आला तर भिडतील. (२)
करून सवरून वर देवपूजा करण्यात ह्याच्या गळ्यात वरमाला पडते. (५)
मुली, तू पुष्कळातून गेलीस की हे कारुण्य उरते! (२)
१५ जिला अपकर्षाची अवस्था म्हणतात ती पहिल्या श्रेणीच्या अरण्यानंतर येते. (४)
२१ जी कळताच होकार समजतो ती संप मोडण्याने मिळेल. (३)
२४ मनोभावे धनदान करण्यात लक्ष्याचा हा घेणे म्हणजे त्याच्यापाशी पोहोचणे. (२)
३३ बाण देणारा भेटला तर मंत्री होईल! (२)

कोड्यात, शोधसूत्रांत किंवा लिहिण्या-तपासण्याच्या सुविधेत चुका आढळल्यास त्या खाली प्रतिसादांत लिहाव्यात.