टिचकीसरशी शब्दकोडे ४९

टिचकीसरशी शब्दकोडे ४९

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
शहरात की चांगल्या कृत्यात तेच कळेना. (३)
विशेष प्रकारच्यास उलटवून जिवाभावाचा करा. (२)
१२ सुराभोवती रिंगण म्हणजे अंगाभोवतीची वस्त्रे (३)
२२ प्रशंसेपाठोपाठ घृणा दर्शवणारे एक उपनगर. (२)
२४ फक्कड डफासकट इथं नाचतात. (२)
३१ कोडकौतुक व्हावे असे हे गृहस्थ. (२)
३३ बांग्लादेशाच्या नाण्याला खोटा पाडू नका. (३)
४१ व्रत घेऊन राहा. (२)
४३ त्याने खिळ्यांनी प्रमाद करावा. (३)
पूर्णचंद्राच्या रात्री नवाच्या आधी पुकार. (३)
चारित्र्याअगोदर बारा वर्षं लावली की विस्ताराने माहिती मिळते. (४)
एकटे कुजून जाई. (२)
१२ या दरवाजाच्या दोन्ही कडांना कडच आहे. (३)
१५ पाणी शिंपडून शेवटी लबाडीच करायची. (४)
२४ तोट्याचा जोरदार तडाखा  (३)
३१ चिकटव आणि लागवड कर. (२)